Peoples Media Pune header

Go Back

रोटरी सिंह्गडरोड आयोजित “रोटरी वाटर ऑलिंपीयाड २०१८”चे उद्घाटन

19 Mar 2018

रोटरी क्लब सिंहगड रोड.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,जाणीव युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोटरी वाटर ऑलिंपीयाड २०१८चे उद्घाटन उपकुलगुरू एन.एस.उमराणी यांच्या हस्ते करण्यात आले.पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण विभागात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रो.सतीश खाडे(प्रकल्प प्रमुख),रोटरी क्लब सिंहगडरोडचे अध्यक्ष रो.अशोक भंडारी,जाणीव युवा संघटनेचे डॉ.श्रीकांत गबाले,नियोजित अध्यक्ष श्रीकांत पाटणकर,संशोधक डॉ.के.सी.मोहिते आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.या १९ व २० मार्च असे दोन दिवस ही स्पर्धा होणार असून यात सर्व शाखांचे विद्यार्थी पाण्याविषयक प्रकल्प,शॉर्ट फिल्म,पोस्टर,मॉडेल्स,व शोधनिबंध सादर करणार आहेत.या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे २०० विद्यार्थी विद्यार्थिनी यात सहभागी होत आहेत.यात प्रथम क्रमांकास रु ७०००/-,द्वितीय क्रमांकास ४ ०००/-,व तृतीय क्रमांकास ३०००/- असे बक्षीस आहे.याचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार दिनांक २२ मार्च रोजी जवाहरलाल नेहरू सभागृह,घोलेरोड,शिवाजीनगर येथे होईल.या प्रसंगी बोलताना एन.एस.उमराणी यांनी मानवाने अनेक समस्यांवर विज्ञान व तंत्रज्ञानाने मात केली आहे.तशीच तो पाणीसमस्येवर ही करेल असे सांगितले.अशोक भंडारी यांनी बोलताना पाणी समस्ये साठी विद्यार्थी,संशोधक,व उद्योग यांना एकत्र आणणे हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे सांगितले.सतीश खाडे यांनी हा उपक्रम आगामी काळात मोठ्या स्वरुपात करण्यात येईल असे सांगितले  

छायाचित्र;प्रकल्प पाहताना अशोक भंडारी,सतीश खाडे व अन्य मान्यवर  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite