रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने यशस्वी उद्योजकांसाठी असलेला “व्यावसाईक गुणवत्ता”(व्होकेशनल एक्सलंस अवोर्ड) डॉ.कल्याणी भट यांना प्रदान करण्यात आला.त्यांनी कर्क रोगावर व त्याच्या उपचारांवर प्रदीर्घ संशोधन केले आहे.दामले हॉल.लॉ कॉलेज शेजारी.झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब डेक्कनच्या अध्यक्ष अनिता कौलगुड,सेक्रेटरी शिरीष पिंगळे,नियोजित अध्यक्ष(भावी)ममता कोल्ह्टकर,मेडिकल डायरेक्टर डॉ.अरुण,डॉ.अलका निरंदर,खजिनदार डॉ.एन.व्ही.पाषाणकर आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य उपस्थित होते.शाल,श्रीफळ,मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.यावेळी बोलताना डॉ.कल्याणी भट यांनी कर्करोग जेव्हडा लवकर लक्षात येईल तेव्हडा उपाय शक्य असतो,मात्र या रोगाला आमंत्रण देणारी जीवनशैली जसे धुम्रपान,तंबाखू टाळणे चांगले असे सांगितले.अनिता कौलगुड यांनी बोलताना समाजात आपल्या उत्तम व्यवसाईक सेवेने कार्य करणा-या व्यक्तींना रोटरी क्लब सन्मानित करीत असल्याचे सांगितले
छायाचित्र:पुरस्कार प्राप्त डॉ.कल्याणी भट,अनिता कौलगुड व अन्य मान्यवर
© 2011. Peoples Media Pune