Peoples Media Pune header

Go Back

हजरत सय्यद शादाद रहेमतुल्ला दर्गा उरूस मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत

23 Mar 2018

महात्मा फुले मंडई येथील प्राचीन दर्गा-हजरत सय्यद शादाद रहेमतुल्ला दर्गा उरूस निमित्त निघालेल्या भव्य संदल-मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.सरबत वाटप करण्यात आले.मिरवणुकीत,सजवलेला.चित्ररथ,नाचणारे घोडे,बँड,पथक,वाद्य पथक,छत्रीइत्यादींचा समावेश होता. ही मिरवणूक मंडई झुणका भाकर केंद्र येथून निघून अखिल मंडई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मन्दिर येथे आली.तेथे मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी मिरवणुकीचे स्वागत केले.व दर्गा ट्रस्टीनी श्रीगणेशाची आरती केली.नंतर शनिपार चौक मार्गे अप्पा बलवंत चौक-फरासखाना चौक येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.व दर्गा ट्रस्टीनी श्री गणेशाची आरती केली.शिवाजी रस्ता मार्गे मिरवणूक मंडई येथील दर्गा जवळ समाप्त झाली.या प्रसंगी अध्यक्ष कुमारभाऊ खडके,गजानन पंडित(सेक्रेटरी)विजय ठकार,अण्णा थोरात,सम्राट थोरात(नगरसेवक),रवींद्र धंगेकर(नगरसेवक),विशाल धनवडे(नगरसेवक),राजेंद्र जगताप(माजी नगरअध्यक्ष सासवड),माणिकदादा चव्हाण विश्वस्त दगडूशेठहलवाई ट्रस्ट.आदी मान्यवरांच्या बरोबर,हिंदु-मुस्लीम असे सर्व जातीधर्माचे भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते.

छायाचित्र :अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष अण्णा थोरात मिरवणुकीचे स्वागत करताना सोबत कुमारभाऊ खडके,मान्यवर व भाविक नागरिक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite