Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब फॉर्च्यूनच्या वतीने कर्तुत्ववान महिलांना “फॉर्च्युन नारी”पुरस्कार प्रदान

23 Mar 2018

रोटरी क्लब ऑफ पुणे फॉर्च्युनच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणा-या महिलांचा फॉर्च्युन नारीपुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.पुरस्कारार्थी-डॉ.वैशाली चौधरी(क्रीडा),सुनंदा जप्तीवाले(सामाजिक),शैला लिमये(महिला मैत्रीण संस्था),कविता सदाशिवे(विधवा महिलांसाठी कुटुंब फौंडेशन),सी.ए.पायल सारडा राठी(केअर फॉर यू संस्था),भाग्यश्री बसेर(कला),आयेशा फर्नांडीस(शिक्षिका),अमृता कदम( क्रीडा),शाल,श्रीफळ.मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.हॉटेल क्लार्कस इन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी फॉर्च्युनचे अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोष्णीवाल,रो.भरत गुरव,खजिनदार भालचंद्र कुलकर्णी आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पुरस्कारप्राप्त महिलांनी ज्याप्रमाणे यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नी आधार असते त्याच प्रमाणे प्रत्येक यशस्वी महिले मागे पती व कुटुंबीय असतात असे सांगितले.दीपक तोष्णीवाल यांनी बोलताना देशाची,समाजाचे,कुटुंबाचे भविष्य घडविण्यात महिलांचा मोठा वाटा असतो असे सांगितले.

छायाचित्र:खुर्चीत बसलेल्या पुरस्कार प्राप्त महिला.खाली बसलेले रोटरी सदस्य,मागे उभे कुटुंबीय व स्नेही   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite