Peoples Media Pune header

Go Back

राधाकृष्ण महिला ग्रुपच्या वतीने रामनवमी निमित्त रामजन्म सोहळा व महाप्रसाद

25 Mar 2018

चैत्र शुध्द नवमीला रामनवमी म्हणून भारतात ओळखले जाते.हा दिवस प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मदिवस.त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात.राधाकृष्ण महिला ग्रुप, नॅन्सी लेक सोसायटी कात्रज यांच्या वतीने गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत रामरक्षा स्तोत्र पठन केले गेले.तसेच रामजन्म सोहळा,सुंठवडा प्रसादवाटप  तसेच  महाप्रसाद भोजन आयोजित करण्यात आले.या प्रसंगी चंद्रा कुन्देन,वैशाली पतंगे,राधिका हरिश्चंद्रे,शकुंतला पवार,रजनी पाटील,शोभा वाईकर,रोहिणी कुंजीर,उषा कुलकर्णी,चंद्रकला बिराजदार,मेघा भुसकुटे,पुष्पा काडगी,शोभा राणे,आशा बनसोडे,ललिता जेरे,यशोदा महिंद आदी उपस्थित होते.

छायाचित्र :रामजन्म सोहळा प्रसंगी रामरक्षा पठण करताना राधाकृष्ण महिला ग्रुप सदस्या 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite