Peoples Media Pune header

Go Back

भगवान वर्धमान महावीर २६१७ व्या जयंती निमित्त गरजूंसाठी धान्य संकलन

29 Mar 2018

एकमुठी धान्य योजनेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांचेकडून प्रेरणा घेत महावीर फूड बँक,पुणे गेली १८ वर्ष विविध दिव्यांग,विशेष,अनाथ मुलांच्या संस्था,वृद्धाश्रम,महिला आश्रम यांना महावीर फूड बँक,पुणेच्या वतीने आज पर्यंत पुणे जिल्ह्यातील १७० विशेष संस्थाना पाच लाख किलो धान्याचे तसेच लाखो रुपयांच्या औषधांचे मोफत वाटप केले आहे.भगवान महावोर जन्मकल्याणक महोत्सव २६१७ च्या निमित्ताने जय आनंद ग्रुप पुणे व महावीर फूड बँक,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.पुण्य प्रदान रथाचे आयोजन करण्यात आले.यास पुणेकर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देवून हजारो किलो धान्य व धान्य खरेदीसाठी एक लाख पन्नास हजार रुपये देणगी दिली.यात पाच रुपयापासून यथाशक्ती मदत केली.लक्ष्मीरोडवर मिरवणूक आली त्यावेळी देहविक्री करणा-या महिलांनीही या पुण्य प्रदान रथावर यथाशक्ती मदत केली.बंदोबस्तावर असणा-या पोलीस कर्मचा-यांनि विशेष संस्थाना मदतीसाठी हात पुढे केला.सौ.प्रमिलाबाई नौपतलाल सकला चॅरीटेबल ट्रस्ट ,तसेच बी.जे भंडारी चॅरीटेबल ट्रस्टचे विजय भंडारी,ट्रस्टचे विजय भंडारी यांनी प्रत्येकी अडीच हजार किलो तांदूळ,डाळी,साखर,गुळ,या पुण्य प्रदान रथावर दिला सकला व भंडारी ट्रस्टचे या कार्यात मोठे योगदान असते,त्याचबरोबर राष्ट्रसंत आनंद ऋषीजी पुण्यतिथी व भगवान महावीर जयंती निमित्त आप अपंग कल्याणकारी संस्थेतील मुलांना चांदमल कोठारी व प्रमोद छाजेड परिवारातर्फे २५० विशेष मुलांना भेळ,पाणीपुरी,स्वीट आईस्क्रीमसह भोजन देण्यात आले.त्याचबरोबर त्यांना खास भेटवस्तू देण्यात आली.या पुण्यप्रदान रथाचे पूर्ण संचालन महावीर फूड बँकेचे पुणे शहर अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांनी केले.त्याच बरोबर जय आनंद ग्रुपचे नवनिर्वाचित अध्यक्ष शान्तिलाला नवलखा,कार्याध्यक्ष विजय प्रर्ख,शांतीलाल देसरडा,संजय कटारिया,विनोद बाफना,अशोक लोंढा,गुलाबजी कवाड,महावीर फूड बँकचे सचिव विजय चोरडिया,बाबुशेठ लुंकड,राम तोरकडी.यांनी विशेष प्रयत्न केले.या पुण्य प्रदान रथावर पर्यावरणासाठी झाडे लावा,झाडे जगवा,पाणी जिरवा,पाणी वाचवा,स्वच्छ भारत स्वस्थ भारत,रक्तदान,नेत्रदान अवयवदान करण्याचा प्रचार प्रसार करण्यात आला.मिरवणुकीतील पुण्यप्रदान रथ हे पुणेकरांचे आकर्षण ठरले.

छायाचित्र :वर्धमान महावीर जन्मकल्याणक सोहळा मिरवणुकीतील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी पुण्यप्रदान रथ 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite