Peoples Media Pune header

Go Back

भगवान महावीर जयंती निमित्त अन्नाची नासाडी टाळा,गरिबांना अन्न दया संदेश

29 Mar 2018

जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणक(जयंती)निमित्त जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीने भव्य लक्ष्मीरोड येथे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.यात हजारो जैन बांधव तसेच सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी होते.अनेक चित्ररथ होते.समितीच्या वतीने अन्नाची नासाडी टाळा,व अन्न हे गरिबांच्या मुखात जावू देतअसा संदेश देणारी नाटिका लहान मुलांनी सादर केली.या प्रसंगी उत्सव समिती अध्यक्ष चंदूभाई शहा,काका गेलाडा,शरदभाई शहा,कचरादास पोरवाल,राजीव शहा.अचल जैन,संपत जैन,दिलीप मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.सोन्या मारुती चौक येथे मिरवणुकीचे स्वागत पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक,नगरसेविका पल्लवीताई जावळे,नगरसेवक प्रवीण चोरबेले,नगरसेवक विशाल धनवडे,नगरसेवक रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहनदादा जोशी.आदी मान्यवरांनी केले.याप्रसंगी बोलताना राजीव शहा यांनी विविध समारंभात,इतकेच नव्हे तर अनेकदा घरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जाते.अनेक गरीब लोक अन्नापासून वंचित असतात अन्नाची नासाडी टाळून गरिबांनाही अन्न मिळावे हा या संदेशाचा हेतू असल्याचे सांगितले.

छायाचित्र :अन्नाची नासाडी टाळा नाटिका सादर करताना बालके,व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite