Peoples Media Pune header

Go Back

“आगामी काळात शिवशाही सरकार येणार असल्याने रयतेवर संकटे येणार नाहीत”.आ.डॉ.नीलमताई गो-हे

31 Mar 2018

 पुणे (दि.३१) पुण्यातील डुल्या मारुती देवस्थान विषयी आख्यायिका सांगितली जाते जनतेवर घोर संकट येणार असल्यास श्री हनुमान मूर्ती डूलते(हलते),मात्र आगामी काळात शिवशाही सरकार येणार असल्याने जनतेवर घोर संकटे येणार नाहीत.शिवसेना समर्थपणे त्यांचा मुकाबला करेल असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ता(कॅबिनेट दर्जा प्राप्त)आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले.कसबा मतदार संघातील प्रभाग कर १७ रस्ता पेठ-रविवारपेठ येथील डुल्या मारुती चौक येथील वाहतूक बेताचे व कारंजे सुशोभिकरण शिवसेना नगरसेवक मा.विशाल धनवडे यांच्या प्रयत्नातून पुणे मनपाच्या माध्यमातून करण्यात आले.त्याचे लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या.याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी व प्रभागातील नागरिक बहुसंखेने उपस्थित होते.यावेळी शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी भविष्यात अशीच लोकोपयोगी विकासकामे करण्याचा विस्वास व्यक्त केला.नीलमताई गो-हे यांनी विशाल धनवडे यांच्या कार्याचे कौतुक करत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असावा अशी आशा व्यक्त केली.तसेच येणा-या काळात शिवसेना कसबा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यास सक्षम असलेले विशाल धनवडे यांनी असेच कामात सातत्य राखावे अशी सूचना केली.ज्यावेळी महाराष्ट्र धर्मावर,रयतेवर एखादे संकट येते तेव्हा शिवसेना कायम शिवशाहीच्या माध्यमातून त्या संकटावर मात करण्यासाठी तत्पर असते व रामभक्त हनुमानजींचे आशीर्वाद शिवसेनेच्या पाठीशी आहेत असे मत व्यक्त केले.श्री डुल्या मारुती देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी यांनी याठिकाणी मा.नीलमताई गो-ह यांचा शाल,श्रीफळ देवून सत्कार केला.प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आदरणीय लांडगे काकांनी मा.विशाल धनवडे यांच्या कार्याचे कौतुक करत शुभाशीर्वाद दिले व डुल्या मारुती मंदिराचा संपूर्ण इतिहास उपस्थिताना समजावून सांगितला.या प्रसंगी शिवसेना शहर संघटक गजानन पंडित,उपशहरप्रमुख उमेश गालिंदे,रवींद्र महंकाळे,जितेंद्र निजामपूरकर,संतोष भूतकर,मयूर कडू,संदीप गायकवाड,अनिल ठोंबरे,तुषार धनवडे,राहुल पारखे,ज्ञानंद कोंढरे,धनंजय देशमुख,अनिरुद्ध खाजगीवाले,शुभम दुगाने,मुकुंद चव्हाण,हनुमंत दगडे,राजेश राऊत,गणेश शिंदे,योगेश खेंगरे,अतुल कु-हे,व्यंकटेश पवार,कुणाल पवार,आशिष शिंदे,आकाश शेरे,गणेश दैठणकर,एकनाथ मोरे,निलेश राऊत,मंगेश कोकाटे,मंगेश वाईकर,प्रशांत वाडकर,प्रवीण डोंगरे,सागर भोसले,योगेश येनपुरे,मुकेश दळवे,योगेश निंबाळकर,रेहान खान,किशोर लगड,निलेश गोरड,भरत चौधरी,प्रशांत परदेशी,अजिंक्य पांगारे,मनोज सूर्यवंशी,जालिंदर अडागळे,पवितरसिंह भोंड,सनी भिसे,विनायक धारणे,अमोल देवळनकर,तसेच महिला आघाडीच्या स्वाती कथलकर,मनीषा धारणे,सुदर्शना त्रिगुणाईत,वृषाली दुबे,व शिवसैनिक मित्रपरिवार उपस्थित होते.  

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी डॉ.नीलमताई गो-हे,विशाल धनवडे व अन्य मान्यवर,तसेच शिल्प 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite