Peoples Media Pune header

Go Back

“पुरुषार्थ ही स्री अथवा पुरुष अशी विभागणी न करता कर्तुत्व व स्वतःची ओळख याच्याशी संबंधीत संकल्पना”,-आ.डॉ.नीलमताई गो-हे

01 Apr 2018

पुरुषार्थ हा स्री अथवा पुरुष अशी ढोबळ विभागणी नसणारा कर्तुत्व व स्वतःची ओळख या संबंधी संकल्पना आहे.ज्यावेळी व्यक्ती आपण कोन आहोत हे स्वीकारते ही बाब त्याच्या जीवनास कलाटणी देणारी ठरते,असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले.स्नेहवर्धन प्रकाशनच्या डॉ.दीपक देसाई लिखित एका पुरुषाच्या अस्तित्वाची लढाई,व डॉ शैला देसाई लिखित ‘My Vision of Make in India”.या दोन पुस्तकांचे प्रकाशन डॉ.गो-हे यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.मराठा चेंबर्सच्या टिळकरोड येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा.आ.मेघाताई कुलकर्णी होत्या तर अध्यक्षस्थानी पद्मभुषण कांतीलाल संचेती होते.स्नेहल प्रकाशनच्या स्नेहल तावरे,लतिकाताई गो-हे,आनंद गोयल,शादाब मुलाणी,महेश शिंदीकर आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना मेघाताई कुलकर्णी यांनी स्री,पुरुष,व तृतीयपंथी असा शारीरिक भेद असला तरी मानसिक भेदाभेद भयावह आहे असे सांगितले.कांतीलाल संचेती यांनी समाजातील सर्व व्यक्तींचा आहे तसा स्विकार महत्वाचा आहे असे सांगितले.स्नेहल तावरे यांनी आभार प्रदर्शन केले. एका पुरुषाच्या अस्तित्वाची लढाई हे २०८ पानी पुस्तक असून किमत २०० रु आहे.My Vision of Make in Indiaहे पुस्तक १०० पानी असून किमत १०० रु आहे.

छायाचित्र :डावीकडून शैला देसाई,दीपक देसाई,मेघाताई कुलकर्णी,कांतिलाल संचेती,नीलमताई गो-हे,स्नेहल तावरे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite