“जादूचे खेळ ही कला लोप पावत चालली आहे.करमणुकीचे,प्रबोधनाचे,व्यक्तिमत्व विकासाचे एक हे एक चांगले साधन आहे,रोटरी क्लबच्या माध्यमातून.अनाथ,अपंग,मतीमंद, एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांच्या करमणुकीसाठी जादूचे प्रयोग करता येतील.”असे प्रतिपादन डॉ.राजेंद्र भवाळकर(संस्थापक अध्यक्ष रोटरी क्लब धायरी)यांनी केले.सोसायटी ऑफ मॅजिशियन्स &इल्यूजनिस्ट संस्थेच्या वतीने उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात कार्यशाळा आयोजन करण्यात आली होती तिच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी आयोजक मुकुंदराव ढवळीकर(अध्यक्ष),अतुल पाटील, अरुण मांडे,मिलिंद कदम(मुंबई),भूपेश दवे,प्रदीप रंगरेज,निलेश मिर्स्त्री,कु.अक्षया,सुनील रावळ,नचिकेत नागरे,ए.लाल,आदी मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र :दिपप्रज्वलन करताना राजेंद्र भवाळकर व अन्य मान्यवर
© 2011. Peoples Media Pune