Peoples Media Pune header

Go Back

व्हॉट्स अप ग्रुपच्या सहाय्याने महिलांनी कंठस्थ केली गीता.३५ महिलांचा गुढी देवून सत्कार

05 Apr 2018

आधुनिक विज्ञान व धर्म यांना सामान्यतः परस्पर विरोधी मानले जाते.मात्र याचाच वापर करून धार्मिक बाबी सुद्धा करता येतात.असा एक आगळावेगळा उपक्रम नॅन्सी लेक होम्स कात्रज येथील राधाकृष्ण महिला मंडळाने केला.त्यांनी व्हॉटस अपचे ३८ ग्रुप केले प्रत्येकी ९ महिलांचा व प्रत्येक दिवसी प्रत्येक महिलेने गीतेतील २ अध्याय पठन करायचे म्हणजेच प्रत्येक दिवसी गीतेतील १८ अध्याय अर्थात पूर्ण गीता होत होती.यापैकी ३५ महिलांची पूर्ण गीता कंठस्थ(पाठ)झाली.त्यांचा सत्कार सोसायटीच्या सभागृहात गुढी देवून करण्यात आला.या प्रसंगी अध्यक्षस्थानी गीता कुलकर्णी,प्रमुख पाहुणे रश्मी पुरंदरे(सभा शिक्षिका),मृणालिनी डोंगरे(व्हॉटस ग्रुप अॅड्मीन,कार्यक्रमाच्या संयोजक संध्या जोशी,चंद्रा कुन्देन,राधिकाताई हरिश्चंद्रे,रजनी पाटील,शकुंतला पवार,सौ.जरे,चंद्रा मिरासदार,विजयालक्ष्मी अम्मा,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी गीता कुलकर्णी यांनी आधुनिक तंत्रज्ञान शत्रू न मानता ईश्वराने दिलेली देणगी समजून त्याचा योग्य वापर करावा असे प्रतिपादन केले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली

छायाचित्र : व्हॉटस अपचे सहाय्याने गीता पाठ केलेल्या सत्कारित महिला व मान्यवर यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite