Peoples Media Pune header

Go Back

अलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा

09 Apr 2018
अलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी तेजिंदरसिंग खनूजा.अलायन्स क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षपदी युवा उद्योजक तेजिंदरसिंग खनूजा यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष सुनिल आगरवाल यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. हॉटेल रामकृष्ण, कॅम्प येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे कर्नल मिक्की ओबेरॉय(रिटा),सुशिल जैन(माजी अध्यक्ष अलायन्स क्लब),हर दिप कौर,शैलजा आगरवाल, शाम मुंदडा,रुपचंद सोनी,आदी मान्यवरांच्या बरोबरच अलायन्स क्लब माजी पदाधिकारी, नवीन बोर्ड सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना कर्नल मक्की ओबेरॉय यांनी गरजवंत लोकांची सेवा व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास हातभार लावने हीच ईश्वर सेवा आहे असे सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष तेजिंदरसिंग यांनी बोलताना आगामी वर्षात समाजोपयोगी असे सामाजिक ,वैद्यकीय, शैक्षणिक, उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite