Peoples Media Pune header

Go Back

शनिवारवाडा निळा झाला.रविवार ८ एप्रिल ते रविवार १५ एप्रिल पर्यंत निळ्या रोषणाईत न्हाऊन निघणार

11 Apr 2018

रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा रोटरी क्लब ऑफ पुणे पौडरोड आणि साद संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने स्वमग्नता (ऑटीझम)या स्थितीतील रूग्णांविषयी जनजागृती प्रयत्न करीत आहेत.त्या मोहिमेचा भाग म्हणून विविध स्मारके निळ्या रंगाच्या प्रकाशात सजविले जाते.एप्रिल हा स्वमग्नता महिना म्हणून ओळखला जातो.भारतात कुतुबमिनार,मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस सुद्धा अशा प्रकाशात सजविली गेली होती.असाच उपक्रम शनिवारवाडा येथे प्रथमच घेण्यात आला आहे.येथे स्वमग्नते बद्दल जनजागृतीसाठी भित्तीपत्रके,बोर्ड सुद्धा लावले आहेत.पुणेकरांनी या आजाराच्या स्थितीबद्दल जाणून घेवून त्याविरीधी लढ्यात आपला सहभाग घ्यावा असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.या प्रसंगी रो संजय कुलकर्णी(रोटरी क्लब शनिवारवाडा),शाम ढवळे(रोटरी क्लब शनिवारवाडा),दिप्ती पुजारी(रोटरी पौडरोड,माधुरी लेले(रोटरी पौडरोड)व साद संस्थेचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite