Peoples Media Pune header

Go Back

गाडीतळ,२२० मंगळवारपेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन .

12 Apr 2018

जुनाबाजार गाडीतळ, २२० मंगळवारपेठ येथील नवीन स्वच्छतागृहाचे उद्घाटन महानगरपालिका अधिकारी माधव देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.या स्वच्छता गृहात महिला व पुरुषांसाठी व्यवस्था आहे.प्रकल्पास सुमारे १३ लाख खर्च आला असून तो कॉमन बजेटमधून करण्यात आला आहे.या प्रसंगी माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी,नगरसेविका सुजाताताई शेट्टी,नगरसेवक रवींद्र धंगेकर,नगरसेवक पल्लवीताई जावळे,नगरसेवक योगेश समेळ, सामाजिक कार्यकर्ते निलेश आल्हाट,अशोक झुळूक(अभियंता),काशिनाथ बिरादार,शंतनू जावळे,मुन्नाशेठ परदेशी,मंगेश साखरे,गोविंद साठे,बाबा कुरेशी,बबलू सय्यद,अबरार शेख,लक्ष्मीताई लोखंडे आदी मान्यवरांच्या बरोबरच महिला व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना माधव देशपांडे यांनी वस्ती-झोपडपट्टी साठी नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचा महानगरपालिका कायम प्रयत्न करते असे सांगितले,सदानंद शेट्टी यांनी बोलताना समाजोपयोगी कामासाठी प्रभागातील सर्व नगरसेवकांनी सहकार्य केले ही उत्तम बाब असल्याचे सांगितले.स्थानिक महिलांनी यापूर्वी धोकादायक व जास्त वाहतूक असलेला रस्ता ओलांडून दूरच्या स्वच्छता गृहामध्ये जावे लागत होते,आता ते टळेल याबद्दल आनंद व्यक्त केला.

छायाचित्र :नवीन स्वच्छतागृह उद्घाटनप्रसंगी सदानंद शेट्टी,माधव देशपांडे,सुजाताताई शेट्टी,निलेश अल्हाट व अन्य मान्यवर आणि नागरिक  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite