Peoples Media Pune header

Go Back

रोटरीच्या वतीने अवयवदान विषयी जागृती कार्यक्रम

15 Apr 2018

रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा,लोकमान्यनगर,वारजे व हिलसाईड यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान या सम्बन्धी जनजागृती कर्यक्रम आयोजित करण्यात आला.रास्थीय फिल्म संग्रहालय प्रभात रोड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.यात फिर जिंदगीही अवयव दानावरील लघुपट दाखवण्यात आला.तसेच ZTCC(झोनल ट्रान्स्फॉर्म कोऑर्डीनेशन सेंटर)च्या सेन्ट्रल कोऑर्डीनेटर आरती गोखले यांनी अवयव दानाविषयी कार्यपद्धती,नियम,कायदे यांची माहिती दिली तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.डॉ.विनय कोपरकर यांनी अवयव दान स्वीकारल्यानंतरचे अनुभव सांगितले.या प्रसंगी संजय कुलकर्णी(अध्यक्ष रोटरी क्लब शनिवारवाडा),राजेंद्र बोंडे(अध्यक्ष रोटरी क्लब लोकमान्यनगर),कुणाल प्रल्हादक(अध्यक्ष रोटरी क्लब वारजे),शारदा चव्हाण(अध्यक्ष रोटरी क्लब हिलसाईड)आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.आरती गणाचार्य यांनी केले.कार्यक्रमा नंतर अनेकांनी अवयव दानाचे फॉर्म भरले.

छायाचित्र:मान्यवर व रोटरी सदस्य यांचे समूहचित्र  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite