Peoples Media Pune header

Go Back

स्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात

19 Apr 2018
स्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशकडून मदतीचा हात आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियानाद्वारे प्रवेश परीक्षेद्वारे प्रत्येक विभागातून ३०० विद्यार्थ्यांची निवडले जाणार पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), राज्य लोकसेव आयोग (एमपीएससी) आदी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या गरीब, गरजू, होतकरू, दिव्यांग व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना 'आकार' देण्यासाठी पुणे येथील आकार फाउंडेशनतर्फे राज्यभर 'आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक विभागातील ३०० विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती आकार फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रा.राम वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी आकार फाउंडेशन, पुणेचे व्यवस्थापकीय संचालक प्रा.प्रवीण मुंढे उपस्थित होते. प्रा. राम वाघ म्हणाले, ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी व कष्टकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणे कष्ट करण्याची क्षमता, गुणवत्ता व स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे सामर्थ्य असूनही प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे असे अनेक विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यापासून वंचित राहतात. अशा गुणवान विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्याच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, त्यांच्या गुणवत्तेनुसार यश मिळवण्याच्या प्रयत्नांना बळ देता यावे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थ्यां चे स्पर्धा परीक्षांद्वारे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आकाराला आणता यावे यासाठी आवश्यक स्पर्धा परीक्षांचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षांच्या परिपूर्ण तयारीची रचनात्मक यंत्रणा उपलब्ध उपलब्ध करून देता यावी यासाठी आकार फाउंडेशन पुणे च्या माध्यमातून पुणे, कोल्हापूर, सोलापूर व औरंगाबाद विभागात या स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान शिष्यवृत्ती अभियानामार्फत प्रवेश परीक्षेचे आयोजन करणार आहोत. तरी या शिष्यवृत्ती अभियानाच्या प्रवेश परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करून सहभाग घ्यावा. पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, जळगाव, नाशिक, अमरावती, नागपूर, यासह राज्याच्या इतरही जिल्ह्यात या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. तरी गरजू विद्यार्थ्यांनी या अभियानात अवश्य सहभाग घ्यावा. "संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सोईनुसार या शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेचे आयोजन दि. २१ मे २०१८ ला कोल्हापूर, दि.२३ मे २०१८ ला सोलापूर, दि २५ मे २०१८ ला उस्मानाबाद आणि दि. २७ मे २०१८ रोजी पुणे या नियोजित जिल्ह्यांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे आहे. या प्रवेश परीक्षेच्या पेपरचे स्वरूप यु.पी.एसी.सी व एम.पी.एस.सी. पूर्व परीक्षेसारखे असणार असून या लेखी परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पुणे विभागाच्या आकार फाउंडेशन पुणे येथे दि २९ मे ते ५ जून २०१८ या कालावधीत मुलाखती घेतल्या जाणार आहेत. लेखी परीक्षा व मुलाखती याद्वारे विभागवार गुणवत्तेनुसार निवड झालेल्या १०० विद्यार्थ्यांना १०० टक्के(एमपीएससी ५०, यूपीएससी ५०), व इतर २०० विद्यार्थ्यांना ५० टक्के(एमपीएससी १००, यूपीएससी १००) शिष्यवृत्ती द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी आकार फाउंडेशन पुणे येथे व्यवस्था केली जाणार आहे" या शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेला १२ वी उत्तीर्ण, पदवीला असलेले व कोणत्याही शाखेतील पदवीधर झालेले विद्यार्थी बसू शकतील. १२ वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित अभ्यासक्रम या परीक्षेसाठी असणार आहे. नोंदणीकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत. त्यासाठी www.aakarfoundation.org या संकेतस्थळास भेट द्यावी. या परीक्षेचा निकाल फाउंडेशनच्या संकेतस्थळावर २८ मे २०१८ ला जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी आकार फाउंडेशनच्या पुणे व नागपूर कार्यालयात अथवा ८७६७९३०९३०/९११२०७८५३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रा.प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite