Peoples Media Pune header

Go Back

आशिष देसाई,मंदार चितळे,व कॉ.अच्युत जोशी यांना रोटरी गणेशखिंडचा गुणवत्ता पुरस्कार प्रदान

28 Apr 2018

 पुणे (दि.२७) रोटरी क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या वतीने आशिष देसाई(हॉटेल व्यवसाय)यांना व्यावसाईक गुणवत्ता पुरस्कार(व्होकेशनल एक्सलंस अवोर्ड),मंदार चितळे(व्यवसायिक) यांना युवा उद्योजक(यंग अचीव्हर)पुरस्कार,डॉ.अच्युत जोशी यांनासेवा पुरस्कार(सर्व्हिस एक्सलंस)पुरस्कार रोटरी प्रांतचे आगामी प्रांतपाल रो.डॉ.शैलेश पालेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शाल श्रीफळ.पुष्पगुच्छ,मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.विद्यार्थी सहाय्यक समिती सेनापती बापट रस्ता येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब गणेशखिंडचे अध्यक्ष प्रमोद बेंद्रे,सेक्रेटरी सुभास म्हेत्रे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी,सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना.शैलेश पालेकर यांनी व्यावसायिक व समाजसेवा ही दोन्ही क्षेत्रे परस्परविरोधी नसून उत्कृष्ट व्यवसायिक सेवेद्वारे ही समाजसेवा घडते असे प्रतिपादन केले.प्रमोद बेंद्रे यांनी बोलताना विविध क्षेत्रातील कार्यक्षम व्यक्तींच्या कार्याचा सन्मान हा प्रगतीसाठी उपयुक्तच असतो असे सांगितले.

छायाचित्र :डावीकडून सुप्रिया काळे,सुभाष म्हेत्रे,मंदार चितळे,प्रमोद बेंद्रे,शैलेश पालेकर,आशिष देसाई,अच्युत जोशी,वर्षा बेंद्रे 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite