Peoples Media Pune header

Go Back

बुद्धपौर्णिमा निमित्त अनाथालय व वृद्धाश्रमास किराणा प्रदान

02 May 2018

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने श्रीसाई प्रतिष्ठान पुणे व देवसेवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुकाई टेकडी हडपसर येथील धर्मवीर शंभूराजे अनाथालय,वृद्धाश्रम यांना गहू,तांदूळ,साखर,डाळी,तेल प्रदान करण्यात आले.तसेच लहान मुलांना लाडू व अन्य खाऊ वाटप करण्यात आले.या प्रसंगी नगरसेवक मारुती आबा तुपे,श्रीसाई प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे अध्यक्ष संजयभाऊ चौधरी,विश्वशांती बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे व्यसनमुक्ती विभागप्रमुख देवा सोनवणे,देवसेवा फौंडेशनचे अध्यक्ष देवा सोनवणे,तसेच श्रीसाई प्रतिष्ठान पुणे व देवसेवा फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

छायाचित्र:मान्यवर व मुलेमुली यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite