Peoples Media Pune header

Go Back

“वरुणराज भिडें सारख्या साक्षेपी पत्रकाराची विधिमंडळ वार्तांकनात नसल्याची उणीव भासत आहे.आ.डॉ.नीलमताई गो-हे

02 May 2018

अत्यंत अभ्यासू,निर्भीड व परिपूर्ण वार्तांकन करणारे पत्रकार वरुणराज भिडे हे विधिमंडळ वार्तांकनात नाहीत याची उणीव आज भासत आहे.त्यांनी राजकीय घराणी,विविध शक्तींचे हितसंबंध,पाणीप्रश्न,व सर्वसामान्यांचे प्रश्न यावर विपुल कार्य केले आहेअसे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ता आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले.वरुणराज भिडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य समेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख होते.एस,एम जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात श्रीधर लोणी (महाराष्ट्र टाईम्स-प्रिंट मिडिया)यांना २५०००/- रोख व स्मृतिचिन्ह,सुहास सरदेशमुख(लोकसत्त्ता)यांना १००००/- रोख व स्मृतिचिन्ह,महेश तिवारी(न्यूज १८,इलेक्ट्रोनिक मिडिया) यांना रोख १००००/-,व स्मृतिचिन्ह,जयश्री बोकील(सांस्कृतिक)यांना १००००/-रोख व स्मृतिचिन्ह,भाग्यश्री चौथाई (सर्वप्रथम विद्यार्थी)१०००/-रोख,चंद्रकांत पांडुरंग(चालू घडामोडी)१०००/-रोख.

         या कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट,वरुणराज भिडे मित्रमंडळाचे मा.आ.उल्हास पवार,अंकुश काकडे,डॉ.शैलेश गुजर,डॉ.सतीश देसाई,विलास जोशी,जयराम देसाई,सुर्यकांत पाठक ,विकास वाळूंजकर विजयाताई भिडे(वरुणराज यांच्या पत्नी),आदी मान्यवरांच्या बरोबरच पत्रकार,नागरिक,व कुटुंबीय उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात लक्ष्मीकांत देशमुख यांनी पत्रकारांनी फक्त नकारात्मक लिखाण करू नये तर सकारात्मक बाबी सुद्धा दाखवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश काकडे यांनी केले.विकास वाळूंजकर.यावेळी स्व.वरुणराज भिडे यांच्या कार्याचे सकेतस्थळ बनविण्यासाठी डॉ.गो-हे यांनी २५०००/-देणगी दिली.  

छायाचित्र :डावीकडून विलास जोशी,श्रीधर लोणी,जयश्री बोकील,नीलमताई गो-हे,लक्ष्मीकांत देशमुख,उल्हासदादा पवार,सुहास सरदेशमुख,महेश तिवारी,अंकुश काकडे 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite