Peoples Media Pune header

Go Back

पुणे मर्चंट्स को-ऑप बँकेच्या अध्यक्षपदी प्रसन्नदादा जगताप यांची निवड

03 May 2018

१९२५ साली स्थापन झालेली पुण्यातील प्रस्थापित बँक पुणे मर्चंट्स को-ऑप.बँकेच्या अध्यक्षपदी पुण्याचे माजी उपमहापौर नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांची निवड करण्यात आली माजी अध्यक्ष विजय ढेरे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.तसेच उपाध्यक्षपदी अजित खेसे यांची निवड करण्यात आली.मावळते उपाध्यक्ष प्रदीप मिसाळ यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरा समोर असलेल्या बँकेच्या मुख्यालयात झालेल्या या निवड प्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून डिबीआर लवंड यांनी काम पहिले.या वेळी संचलक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.पुणे जिल्ह्यात बँकेच्या ११ शाखा कार्यरत आहेत.यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसन्नदादा जगताप यांनी आगामी काळात ग्रामीण व शहरी भागांतील सर्व स्तरातील लोकांना बँक सुविधा मिळावी यासाठी शाखा विस्ताराचा कार्यक्रम हाती घेण्याचा मनोदय व्यक्त केला.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite