Peoples Media Pune header

Go Back

शिवसेनेच्या वतीने आयोजित नोकरी महोत्सवास आ.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या सदिच्छा

05 May 2018

शिवसेना पुणे शहरप्रमुख मा.आ.चंद्रकांत मोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.त्यास भेट देवून आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी माहिती घेतली तसेच हा समाजोपयोगी उपक्रम असून सर्वाना सदिच्छा दिल्या.गुजराती शाळा,सिटीपोस्ट येथे संपन्न झालेल्या या मेळाव्याचे आयोजन शहर संघटक राजेंद्र शिंदे,विभाग प्रमुख बाळासाहेब मालुसरे,शहर समन्वयक राजेश बारगुजे यांनी केले.या प्रसंगी शहर प्रमुख मा.आ.महादेवराव बाबर,प्रशांत बधे(शहर सह संपर्क प्रमुख),जयश्री भणगे(शहर समन्वयक),वृषाली दुबे(कसबा समन्वयक)अनिल जाधव,नागेश खडके,नंदकुमार काळे,युवराज पारीख,बकुळ डाखवे,संजय मोरे,निलेश शहा,मकरंद पेठकर,सतीश लांडगे,रोहित हितमुद्दे,आशिष पोटे,आदी मान्यवर उपस्थित होते.या महोत्सवाचे तांत्रिक संचालन कनेक्टिंग टॅलेंटचे संतोष भनसाळी,व नम्रता इसरानी यांनी केले.या शिबिराचा लाभ सुमारे २०० तरूण-तरुणींनी घेतला असे भनसाळी यांनी नमूद केले.या ठिकाणी आयपीओ.बीपीओ,आयटी,कंपनी प्रतिनिधी सहभागी होते.

छायाचित्र :शिवसेना रोजगार मेळावा दीपप्रज्वलन प्रसंगी नीलमताई गो-हे,महादेव बाबर,राजेंद्र शिंदे,बाळासाहेब मालुसरे,राजेश बारगुजे व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite