Peoples Media Pune header

Go Back

२४ वा शाहीर मधु कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला गौरव पुरस्कार

18 May 2018

नटरंग अॅकडमी तर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा शाहीर मधु कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार यंदाचे वर्षी ख्यातनाम लेखक दिग्दर्शक सुबोध भावे यांना जाहीर करण्यात येत आहे.सदर पुरस्काराचे हे २४ वे वर्ष असून आजतागायत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी,विनोदी अभिनेते प्रशांत दामले,सिद्धार्थ जाधव,भरत जाधव,विनोदी अभिनेत्री वंदना गुप्ते,निर्मिती सावंत,रंगभुषाकार प्रभाकर भावे,शाहीर दादा पासलकर,लेखक,दिग्दर्शक अभिनेता संतोष पवार,ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर,ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर,अभिनेत्री शर्वरी जमेनीस,लेखक दिग्दर्शक,केदार शिंदे,ज्येष्ठ अभिनेते विजय कदम,अभिनेत्री क्रांती रेडकर,निलेश साबळे,आदि कलावंताना हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.

शाहीर मधु कडू: शाहीर मधु कडू यांच्या आकस्मिक निधनाने संस्थेची अतिव हानी झाली आहे.गाढवाचे लग्न या वगनाट्याला अजरामर करणा-या या गुणी सोंगाड्याच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी गेली २४ वर्ष हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो

पुरस्काराविषयी: यंदाचे वर्षी सदर पुरस्कार गुणवान लेखक दिग्दर्शक सुबोध भावे यांना प्रदान करण्यात येणार असून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न,औषध प्रशासन,नागरी पुरवठा मंत्री तसेच संसदीय कार्यमंत्री आणि नटरंग संस्थेचे विद्यमान अध्यक्ष नामदार गिरीश बापट यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्कार सोहळ्याला पुणे शहरातील सामाजिक तसेच कलाक्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.आ.माधुरीताई मिसाळ,नगरसेवक दीपक मानकर,महापौर मुक्ताताई टिळक,व अन्य.

सदर पुरस्काराचे स्वरूप :शाल,श्रीफळ,तुळशीचे रोप,गौरवपत्र,फळांचा बुके,सन्मानचिन्ह व रोख रक्कम असा असेल.हा पुरस्कार सोहळा बुधवार दि ३० में २०१८ रोजी सांयकाळी ठीक ५ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे पार पडणार आहे.या समारंभ प्रसंगी नटरंगच्या २०० गुणवान बालकलाकारांचा आवर्तन हा विनोदी व नृत्यप्रधान दर्जेदार कार्यक्रम सादर होणार आहे.आकर्षक नेपथ्य,नेत्रदीपक ध्वनीप्रकाश व्यवस्था याने हा कार्यक्रम रंगतदार होणार आहे.

   नेपथ्य कौस्तुभ शेडे व साजन शिंदे,विठ्ठल गिरे यांनी केले असून ध्वनी प्रकाश व्यवस्था रुद्र साऊंड व लाईट यांची आहे.कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन प्रणव कडेकर,पुष्कर तावरे,वैष्णवी गिरे यांचे असून संकल्पना आणि दिग्दर्शन जतीन पांडे यांनी केले आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite