Peoples Media Pune header

Go Back

उच्चशिक्षित जैन वधुवर मेळावा संपन्न.२१५ इच्छुक सहभागी

10 Jun 2018

जैन समाजातील उच्चशिक्षित वधुवर मेळावा महालक्ष्मी लॉन डीपी रोड येथे संपन्न झाला.हा तेरावा मेळावा असून त्यात २१५ इच्छुक वधुवर व त्यांचे पालक उपस्थित होते.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजयभाई शहा,प्रमुख पाहुणे अॅड विजय कांतीलाल शहा,लताबेन शहा,उपाध्यक्ष,रोहित जव्हेरी,योगेश शहा,राजीवभाई शहा आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व वधुवरांसाठी एक अॅपचे ही उद्घाटन करण्यात आले.तसेच प्लास्टिक वापर टाळा हा संदेश देण्यासाठी सर्वाना कापडी पिशव्या देण्यात आल्या.उद्घाटन प्रसंगी बोलताना विजय शहा यांनी हल्ली मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत,सेटल वर हवा,शहरात हवा खेड्यात नको असे असते.मात्र सेटल होण्यात काही कालावधी लागतो.भविष्यातील प्रगतीचा विचार करून वर निवडावा.शहरात ज्यास्त उत्पन्न पुरत नाही खेड्यात अल्प उत्पन्नही पुरते.तसेच वरांनी देखील वधूचे फक्त दिसणे बघण्याएवजी गुण पाहावेत असे सांगितले. आभार रोहित जव्हेरी यांनी मांडले

छायाचित्र :दीपप्रज्वलन करताना डावीकडून रोहित जव्हेरी,अॅड विजय कांतीलाल शहा,विजयभाई शहा,लताबेन शहा 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite