Peoples Media Pune header

Go Back

रोटरीच्या वतीने साने गुरुजी आरोग्य केंद्र येथे अद्ययावत नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन

12 Jun 2018

भारतात व महाराष्ट्रात योग्य त्या साधन समुग्री अभावी नवजात शिशु मृत्य प्रमाण मोठे आहे.हे लक्षात घेवून रोटरी क्लब पुणे मेट्रो,सहकारी रोटरी क्लब आणि अमेरिका स्थित पायोनियर संस्था यांच्या वतीने हडपसर येथील साने गुरुजी आरोग्य केंद्र येथे नवजात शिशु अतिदक्षता विभाग निर्माण करण्यात आला.याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी प्रांतपाल अभय गाडगीळ,माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी,रोटरी क्लब मेट्रोचे अध्यक्ष माधव तिळगुळकर,महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर,अमेरिकेतील पायोनियर संस्थेचे डॉ.नितीन चौथाई,मकरंद फडके,नगरसेवक हेमंत रासने,प्रणीता जोशी,संजय कुलकर्णी, सतीश आगरवाल,आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी, सदस्य,व साने गुरुजी आरोग्य केंद्राचे कर्मचारी,नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.सुमारे ६५ लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पात व्हेंटीलेटर्स,वोर्मर,एनआयबीपी मॉनिटर व अन्य अशा ५८ साधनांचा समावेश आहे.या प्रसंगी बोलताना गिरीश बापट यांनी नवजात बालक सुरक्षेसाठी प्रथम मातेचे आरोग्य सुदृढ हवे,सरकार सर्वच काही करू शकत नाही,यासाठी रोटरी सारख्या सामाजिक संस्थांनी पुढे येणे ही स्तुत्य बाब आहे.माधव तिळगुळकर यांनी प्रास्तविक केले.तसेच फक्त साधनेच नाही तर प्रशिक्षण देवून ती ऑपरेट करणारे लोक तयार केले.ही महत्वाची बाब असल्याचे सांगितले.

छायाचित्र:नवजात शिशु अतिदक्षता विभागाची पाहणी करताना गिरीश बापट,माधव तिळगुळकर व अन्य  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite