Peoples Media Pune header

Go Back

१६ जून रोजी जीएसटी विषयक एक दिवसीय कार्यशाळा

13 Jun 2018

पश्चिम महाराष्ट्र करसल्लागार संघटना,ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टीशनर-वेस्ट झोन,टॅक्सेशन कन्सल्टंटस असोसिएशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १६ जून २०१८ रोजी एक दिवसीय जीएसटी रिफ्रेसिंग कोर्सया कार्यशाळेचे आयोजन केले आहे.ही कार्यशाळा टिळक रस्ता येथील नीतू मांडके सभागृहात सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत संपन्न होईल.यावेळी पुढील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. एस वेंकटरमणी (C.A),सी.व्ही चितळे(C.A.),अॅड.अशोक संघवी,अनिल वखारिया.अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र करसल्लागार संघटनाचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी पत्रकात दिली. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite