Peoples Media Pune header

Go Back

पुण्याच्या हेअर व मेकअप राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार-कैलास काशीद सुवर्णपदक,जुई सपके कांस्यपदक

14 Jun 2018

ऑल इंडिया हेअर अॅन्ड ब्युटी असोसिएशनच्या वतीने आयोजित तिसाव्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पुण्याच्या कैलास काशीद याने सुवर्णपदक तर जुई सपके हिने कांस्यपदक पटकविले.या स्पर्धेत महाराष्ट्रातील ४७ जननी भाग घेतला,त्यात पुण्याचे २६ स्पर्धक होते.दिल्ली येथील प्रगती मैदानावर नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत देशातील ३७० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.पुणे हेअर ब्युटी असोसिएशनच्या अध्यक्ष भक्ती सपके यांनी सांगितले कि या स्पर्धा परीक्षकांत अमेरिकेचे जीनिया विल्यम,चीनचे इवान,श्रीलंकेचे निहाल रणतुंगा हे होते.त्यांनी विजेत्यांची निवड केली.विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे इंटरनॅशनल स्कूल ऑफ अथेटिक्स अॅन्ड स्पा अॅकॅडमीचे कैलास काशीद सुवर्ण पदक,जुई सपके कांस्यपदक,सूर्या पंडीधर आणि कैलास काशीद हे पहिला पाच स्पर्धकांत होते.शरमि लिबू-ब्रायडल हेअर स्टायलिंग मध्ये मेडोलीयन,पायल राजा-टोटल फँटसी लुक मध्ये पहिल्या चारमध्ये मेडोलीयन,सूर्या पंडीधर,रोहन पुजारी,सिद्धार्थ हडपड,समीर शेख,संतोष काशीद - यांना जेन्ट्स ट्रेंड हेअरकट,सूर्या पंडीधर संतोष काशीद-हेअर टॅटू,भूमिका जैन,रश्मी किराड,सोनल शहा,फातिमा शेख,सदिच्छा सोनी,श्रद्धा वांद्रे,सिमरन मोहोलं,ज्योती जैस्वाल,ब्रायडल मेकअप,अंजली,कृष्णा देसाई पायल राजा,सिमरन मोहोळ-टोटल फँटसी लुक,या सर्व स्पर्धकांना इंटरनॅशनल स्कूल ऑफ अथेटिक्स अॅन्ड स्पाच्या संचालिका भक्ती सपके,हेअर मेकअप एक्स्पर्ट शीतल देशमुख आणि जयश्री गोंदालिया यांनी केले.या विजेत्यांना १००००/-,७५००/-,५००० अशी रोख रक्कम प्रशस्तीपत्र,पदक,व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.तसेच मुंबईच्या यु टक्के हेअर अॅन्ड स्कीन अॅकॅडमीच्या रीना देवरुखकर यांना लेडीज प्रोग्रेसिव्ह हेअरकट मध्ये रौप्यपदक,आविष्कार पाटील यांना लेडीज कमर्शियल हेअरकट मध्ये सुवर्णपदक,संपत कुमार सुवर्णपदक,हेमा धवन यांना ओनलाईन मेकअप कांस्यपदक,छाया पाटील ट्राडीशनल ब्रायडल मेकअप सुवर्णपदक,लायन पारसीकर वेस्टर्न ब्रायडल रौप्यपदक,या सर्व स्पर्धकांना यु टक्के हेअर अॅन्ड स्कीन अॅकॅडमीच्या संचालक व संचालिका उदय टक्के व हर्षदा टक्के यांनी केले 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite