Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब सहवासचा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार,अरविंद नातू,प्रांजली देशपांडे,विनिता आपटे,मनस्वी आंदूरकर यांना प्रदान

16 Jun 2018

रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या वतीने देण्यात येणा-या व्यावसाईकगुणवत्ता पुरस्कारांचे वितरण पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते करण्यात आले.यावर्षी हे पुरस्कार डॉ.अरविंद नातू(शास्रज्ञ),प्रांजली देशपांडे(नगररचनाकार),विनिता आपटे(सूत्रसंचालक-मुलाखतकार),कु.मनस्वी आंदूरकर(कराटे खेळाडू),यांना प्रदान करण्यात आले.शाल श्रीफळ,मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.महर्षी कर्वेनगर येथील क्षिप्रा सहवास हॉल येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी सहवासचे अध्यक्ष रो.दिनकर पळसकर,सेक्रेटरी रो.अनिल जाधव,आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरीचे पदाधिकारी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना मुक्ताताई टिळक यांनी मनपा अथवा शासनाकडे साधनसामग्री असते मात्र ती पुरेशी असेलच असे नाही अशा वेळी रोटरी सारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत मोलाची ठरते असे सांगितले.सत्काराला उत्तर देताना अरविंद नातू यांनी विद्यार्थ्यांनी झापडबंद पद्धतीने करीयर निवडू नये.मुलभूत शास्त्र या विषयात ही करीयर करावे यामुळे देशाच्या प्रगतीस मोठा हातभार लागेल असे प्रतिपादन केले.

छायाचित्र :पुरस्कारार्थी व रोटरी क्लबचे मान्यवर यांचे समूहचित्र  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite