Peoples Media Pune header

Go Back

जेनेसिस ग्राहक निर्देशांक २०१९ मध्ये वाढून ६०.४५ वर पोहोचला

16 Jun 2018

नुकत्याच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये  जेनेसिस मार्केट रिसर्च कंपनीचे कार्यकारी संचालक श्री अनिल धनेश्वर यांनी सांगितले कि मे २०१९ मध्ये ग्राहक निर्देशांक(कन्झुमर सेंटीमेंटस)मागील सहा महिन्यातील सर्वात अधिक आहे.मागील वर्षातील धान्य उत्पादन,फळ व भाजीपाला यांच्या किमतीत मर्यादित वाढ,साखरेचे विक्रमी उत्पादन,वाढती वाहन विक्री,घरबांधणी व पायाभूत सुविधा यातील वाढती गुंतवणूक,वाढती मोबाईल व कपड्यांची विक्री व रोजगाराची संधी या सर्वांमुळे हा निर्देशांक वाढण्यास मदत झाली.इंधनातील दरवाढ व त्यामुळे होणारी महागाईही एक चिंतेची बाब जरूर असली तरी देखील वाहन विक्रीने उच्चांक गाठला.इंधनाची विक्री देखील फारशी कमी झाली नाही.याचाच अर्थ आपल्या देशातील लोकांची आर्थिक प्राप्ती वाढत असून राहणीमानातही वेगाने वाढ होत आहे.रोजगाराबाबत जरी लोक पूर्ण समाधानी नसले तरी पुढील काही महिन्यात परिस्थिती पूर्णपणे बदलून जाईल.घरबांधणी,प्राथमिक व पायाभूत सुविधा,होणारी भरघोस गुंतवणूक यामुळे रोजगाराच्या अधिकाधिक संधी नजीकच्या भविष्यकाळात उपलब्ध होतील.चिंतेचे कारण नाही.आगामी वर्षात आपली अर्थव्यवस्था सुमारे ७.७% दराने वाढणार आहे असे जागतिक बँकेने नुकतेच जाहीर केले असून हा दर जगातील सर्वात अधिक आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी संपूर्ण भारतातील १० महानगरे व ३६ टियर २ शहरांमधील रहिवाश्यांच्या मुलाखती घेण्यात आली.जेनेसिस मार्केट रिसर्च ही संस्था पुणे स्थित असून अनेक प्रसिद्ध भारतीय व अंतरराष्ट्रीय कंपन्यान बाजारपेठ संशोधन विषयक सल्लासेवा गेली २५ वर्ष पुरवित आहे.

अधिक माहितीसाठी श्री अनिल धनेश्वर,कार्यकारी संचालक –मो.9890303389

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite