Peoples Media Pune header

Go Back

“सेंट नेरी मराठी मेडियम”चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होणार

20 Jun 2018

आजकाल इंग्रजीचा सर्वत्र बोलबाला आहे.यातून मायबोली मराठीला कधी कधी कमी लेखले जाते.पालक सुद्धा मुलांना इंग्रजी मध्यम शाळेत घालतात मात्र तेथे फक्त पुस्तकी शिक्षण मिळते.संस्कार मात्र घरातून व त्यातल्या त्यात घरातील वयोवृद्ध व आई वडीलांकडून मिळते हे अधोरेखित करणारा चित्रपट सेंट नेरी मराठी मेडियमहा मराठी चित्रपट येत्या २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.चित्रपटाचे निर्माते राजेश जाधव असून फिरोज खान व अमन खान हे दिग्दर्शक आहेत.चित्रपटात भूमिका गिरीजा प्रभू,राकेश शिंदे,मनोज भालनकर,काजल येनपुरे,आहेत असे सिक्स सेन्स फिल्म प्रॉडक्शनचे संतोष महाले,प्रशांत वडके,सागर शेलार,राम सांगळे,राजेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.तसेच विद्यार्थी व पालक यांनी हा चित्रपट आवर्जून पहावा असे आवाहन केले.सिक्स सेन्स फिल्म प्रोडक्शनचा आगामी चित्रपट cbi  ऑपरेशन मीरा हा देखील लवकरच प्रदर्शित होणार असून त्यात अंकिता महामुंकर या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite