Peoples Media Pune header

Go Back

हितेंद्र अॅडव्हर्टायझींग अँड मार्केटिंग कंपनी करणार चित्रपट निर्मिती-बॉम्बे टॉकिज बरोबर करार

23 Jun 2018

हितेंद्र अॅडव्हर्टायझींग अँड मार्केटिंग कंपनीने चित्रपट,लघुपट,डॉक्युमेंटरी निर्मिती क्षेत्रात  पदार्पण करण्याची योजना आखली आहे.त्यासाठी बॉम्बे टॉकिज या बॉलिवूडच्या ज्यांनी ३५० हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले आहेत, अशा चित्रपट क्षेत्रातील पहिल्या स्टुडीओ व फिल्म सर्जकांशी करार केला आहे.हितेंद्र सोमाणी यांनी हितेंद्र अॅडव्हर्टायझींग अँड मार्केटिंग.प्रा.लि.ही कंपनी ३० वर्षापूर्वी चालू केली.संपूर्ण भारतात रिक्षा जाहिरात करणारी अग्रगण्य म्हणून ही कंपनी ओळखली जाते.या संस्थेस आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये त्यांचे नाव आहे.कटलॉग शो,पुणे रिव्ह्यू,रिक्षा जाहिरात,४० फुट उंच व विविध आकारात बलून,करीयर फेअर,आंतरराष्ट्रीय युथ एक्स्चेंज कार्यक्रम असे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबविले आहेत.

   मागील आठवड्यात त्यांनी तयार केलेल्या सुरक्षित भविष्य”,या अॅनिमेशन शॉर्ट फिल्मला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डच्या  वतीने पुरस्कार मिळाला होता.या फिल्मला यापूर्वी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता.साउथ कोरिया मध्ये १९२ देशांच्या पर्यावरण विषयक कॉन्फरन्स मध्ये देखील ही फिल्म दाखवली गेली होती.सध्या दूरदर्शनवर ही फिल्म नित्य प्रसारित केली जाते.या फिल्मच्या लोकप्रियतेने व यशाने प्रेरित होवून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत असल्याचे निर्माते हितेंद्र सोमाणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.अधिक माहितीसाठी हितेंद्र सोमाणी १३५ अक्षय कॉम्प्लेक्स.ढोले पाटील रोड पुणे १ 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite