Peoples Media Pune header

Go Back

गुरुपोर्णिमें निमित्त ६ जुलै रोजी प.पु.सुधाशुजी महाराज यांचा सत्संग,गुरुपूजा,व गुरुदर्शन

29 Jun 2018

भारतीय परंपरेत गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे.गुरुपोर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो.या दिवशी गुरुचे दर्शन,आशीर्वाद व उपदेश घेण्याची प्राचीन रूढी आहे.याला अनुसरून विश्वजागृती मिशनच्या वतीने शुक्रवार दिनांक ६ जुलै रोजी प.पु.सुधांशुजी महाराज यांच्या सानिध्यात गुरुपुर्णिमा महोत्सव.चे आयोजन केले आहे.यात सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत सत्संग,गुरुपूजा,व गुरुदर्शन संपन्न होईल.संध्याकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत सत्संग होईल.हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंग मंच स्वारगेट येथे संपन्न होईल.तरी सर्व भाविकांनी याचा सहपरिवार व मित्रमंडळीं सोबत लाभ घ्यावा.व प.पु.सुधांशुजी महाराज यांच्या अमृतवाणीने जीवन धन्य करावे असे आवाहन विश्वजागृती मिशनचे पुणे मंडल अध्यक्ष घनश्याम झंवर यांनी पत्रकार परिषदेत केले.या प्रसंगी मिशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite