Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब्सच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

01 Jul 2018

रोटरीचे नवीन वर्षाचे कामकाज १ जुलै रोजी सुरुवात होते.नवीन कामकाज वर्षाचा पहिला दिवस सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा या हेतूने रोटरी क्लब हडपसर सेन्ट्रल व १६ अन्य क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.हॉटेल सुरेश इन येथे झालेल्या या शिबीरात सुमारे ११५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या प्रसंगी रोटरी हडपसरचे सेक्रेटरी महेंद्र लुणिया,क्लब अॅडमिन डॉ.राकेश रांका,मुकेश सोनी,पोपटराव शिंदे,सामजिक कार्यकर्ते सागर भंडारी,हेमंत पवार,प्रशांत मुथा,मगरपट्टा सिटी क्लबचे सुर्यकांत चौधरी,व अन्य रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.शिबिराचे तांत्रिक संचालन रेड प्लस रक्तपेढीने डॉ.दीपक राजहंस व पी.के.शिंदे.यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite