Peoples Media Pune header

Go Back

जीएसटीचा पहिला वाढदिवस केक कापून साजरा.पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असो.चा उपक्रम

01 Jul 2018

गेल्यावर्षी १ जुलै रोजी देशभर जीएसटी लागू करण्यात आला होता.म्हणून आज रोजी जीएसटीचा पहिला वाढदिवस पच्छिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनरर्स असोसिएशनच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला.यादव भवन शुक्रवारपेठ येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पच्छिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे,सचिव नवनीतलाल बोरा,उपाध्यक्ष अतुल कुलकर्णी,सीए अभय बोरा,जी.वाय.पटवर्धन,मिलिंद भोंडे आदी मान्यवरांच्या बरोबरच करसल्लागार मोठ्या संखेने उपस्थित होते.अभय बोरा यांनी यावेळी जीएसटी विषयी अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.या प्रसंगी बोलताना नरेंद्र सोनवणे यांनी गेले वर्ष करसल्लागार मंडळीना तणावाचे व धावपळीचे गेले.मात्र आगामी काळात व्यवस्थेत सुधार होईल.देशाच्या कर संकलनात वाढ होऊन विकासाला गती मिळेल असा आशावाद व्यक्त केला

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite