Peoples Media Pune header

Go Back

तिस-या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात होणार ११११ लघुपट प्रदर्शित

03 Jul 2018

शनिवार १ ते सोमवार दिनांक १० सप्टेंबर या कालावधीत पुण्यात विजय टोकिज येथे भव्य असा आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या आक्रा दिवसात तब्बल ११११ लघुचित्रपटांचे प्रदर्शन करून एक विश्वविक्रम केला जाणार आहे.यात आतापर्यंत ८४ देशांच्या स्पर्धकांचा समावेश झाला आहे.सुमारे १०० देश सहभागी व्हावेत असा प्रयत्न आहे.समावेश झालेल्या देशांत अमेरिका,चीन,जपान,रशिया,ऑस्ट्रेलिया,पाकिस्तान,फ्रांस,सौदी अरेबिया,चिली, ब्राझील,ग्रीस,मलेशिया व अन्य देशांचा समावेश आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून जगभरातील लघुचित्रपट निर्माते एकत्र यावेत हा हेतू आहे.यासाठी प्रवेश घेण्याची मुदत १५ जुलै असून इच्छुकांनी मो.7249417965 ,येथे किंवा www.isfilmfestivalpune.in येथे संपर्क करावा असे आवाहन संयोजक अमोल भगत यांनी प्रसिद्धी पत्रकात केली आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite