Peoples Media Pune header

Go Back

सेक्स वर्कर्स महिलांच्या मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी रोटरी क्लब धायरीच्या वतीने कार्यक्रम

03 Jul 2018

सेक्स वर्कर महिला भगिनींच्या मुलांना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ धायरीच्या वतीने भरत नाट्यमंदिर यथे कोरडही एकांकिका सादर करण्यात आली.ही शेतकरी आत्महत्या विषयावर होती.तसेच व्हॅलेंटाइन डेही हलकी फुलकी प्रेमावरील एकांकिका ही सादर करण्यात आली.कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.या प्रसंगी रोटरी धायरीचे अध्यक्ष अॅड हृषीकेश महाजन,सेक्रेटरी सुप्रिया निगडे,संस्थापक अध्यक्षरो.डॉ.राजेंद्र भवाळकर,माजी अध्यक्ष रसिका भवाळकर,भारत दवे,संध्या देपोलकर,राजू कदम,राहुल बरडे,राजेंद्र नलगे,आदी मान्यवरांच्या बरोबरीने अन्य सदस्य व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना राजेंद्र भवाळकर यांनी या महिला परिस्थितीने या व्यवसायात असल्या तरी त्यांना आपल्या मुलांना उज्ज्वल भवितव्य असावे अशी तीव्र इच्छा असते.त्यांच्या मुलांना मदतीसाठी समाजाने पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन केले.

छायाचित्र :मान्यवर व कलाकार यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite