Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब हडपसरच्या वतीने थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्तपुरवठा

04 Jul 2018

रोटरी क्लब ऑफ हडपसर सेन्ट्रल व अन्य १९ रोटरी क्लब आणि तोडकर हॉस्पिटल मंगळवार पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया रुग्णांसाठी मोफत रक्तपुरवठा करण्यात येणार आहे.या कामी तोडकर हॉस्पिटलने २ बेड कायमस्वरूपी मोफत देणार असल्याचे जाहीर केले तर रेड पळस या रोटेरीयन पोपटराव शिंदे संचलित रक्तपेढीने रक्तबॅगा मोफत देणार असल्याचे सांगितले.या संपूर्ण प्रकल्पाची ह्ताळणी आणि संचालन रोटरी क्लब हडपसर सेन्ट्रल करणार असल्याची माहिती क्लब अॅडमिन डॉ.राकेश रांका,मुकेश सोनी यांनी दिली.या प्रसंगी डॉ.हेमंत व डॉ.जयश्री तोडकर यांनी उपस्थित २० रोटरी क्लबचे प्रमुख व रोटेरीयन तसेच सामजिक कार्यकर्ते सागर भंडारी, रोटेरीयन मोहन कापरे,शिरीष तापडिया,व रोटरी क्लब हडपसर सेन्ट्रलचे सचिव महेंद्र लुणिया यांना या रोगाविषयी माहिती दिली.आणि रोटरीने या रोगा विषयी समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले.यावेळी परी गवळी या अडीच वर्षाच्या बालिकेला रक्त देण्यात आले. थॅलेसेमिया रुग्णांनी व ज्या रुग्णांना वारंवार रक्त द्यावं लागते त्या रुग्णांनी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पुणे हडपसर सेन्ट्रलचे सचिव महेंद्र लुणिया यांनी केले आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite