Peoples Media Pune header

Go Back

बुरुडी पूल येथे शिवसेनेच्या वतीने वारक-र्यांसाठी विविध उपक्रम

08 Jul 2018

पालखी सोहळा असणा-या भवानीपेठ या मध्यवर्ती भागात शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.यात मोफत आरोग्य तपासणी,औषधे वाटप,पीडीसीसी बँकेच्या सहकार्याने मोबाईल एटीएम सेंटर,अन्नदान,वारकरी सत्कार,व आनंदकंदया भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचा समावेश होता.या सेवांचा लाभ हजारो वारकरी बांधवानी घेतला.या प्रसंगी आयोजक सचिन चिंचवडे(कसबा संघटक),परभणीचे खासदार श्री जाधव,माजी शहर प्रमुख रामभाऊ पारीख,पुणे शहर समन्वयक पै.राजेश बारगुजे,शहर संघटक राजेंद्र शिंदे,उपशहर प्रमुख संजय मोरे,गणपतमामा घोणे,राजेंद्र सिंघवी,नितीन शहा,अनुप जठार,अनिल लेकावळे,प्रशांत लेकावळे,सत्यजित गुदगे,अजय डावरे,महेश तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना रामभाऊ पारीख यांनी वारकरी लोकांना आवश्यक त्या अनेक सेवा एकाच ठिकाणी देणे ही स्तुत्य कल्पना आहे आसे सांगितले.

छायाचित्र:वारीतील वासुदेवांचा सत्कार करताना रामभाऊ पारीख,सचिन चिंचवडे,राजेंद्र शिंदे,

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite