Peoples Media Pune header

Go Back

सुकांता ट्रस्टच्या वतीने दिंडीतील ११० महिलांना साडीचोळी वाटप

08 Jul 2018

स्वर्गीय मातोश्री श्रीमती कांताबाई मार्लेच्या यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुकांता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिंडी क्र ९३ मधील ११० महिलांना साडीचोळी वाटप करण्यात आले.तसेच वारकरी बांधवाना टोपी व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.सुकांता बंगला येथे झालेल्या या कार्यकम प्रसंगी आयोजक विजयकुमार मर्लेचा,हभप श्रीकृष्ण महाराज भगत(नातेपुते),हभप श्रीहरी महाराज भगत(नातेपुते),हभप विक्रम महाराज(खानदेश),नगरसेविका मानसीताई देशपांडे,अशोक कुंकूलोळ,सुनील मुथा,मदन वाणी,सुमती जोशी(नासिक) आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व वारकरी दिंडीतील लोकांसाठी अमरनाथ मित्रमंडळ व मर्लेचा परिवर यांच्यावतीने,सकाळचा नाष्टा,व भोजन यांची व्यवस्था करण्यात आली होती.या प्रसंगी गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण डॉ.प्रकाश पटवर्धन यांनी केले.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite