Peoples Media Pune header

Go Back

किशोरवयीन मुलामुलींच्या अर्थसाक्षरतेसाठी निमकाची प्रशिक्षण योजना

07 Aug 2018

माजी सैन्यअधिकारी प्रिन्स पॉल यांनी किशोरवयीन मुलामुलींच्या अर्थसाक्षरतेसाठी पुढाकर घेवून निमकाही संस्था सुरु केली आहे.आर्थिक नियोजन हे शिकण्याचे कौशल्य आहे.मात्र कोणत्याच शाळेत हे शिकविले जात नाही.पालकही हे शिकविण्यास असमर्थ असतात.मुले स्वत: ट्रायल अॅन्ड एरर पद्धतीने शिकतात.यासाठी निमकाने पुढाकार घेवून प्रथमच यासाठी आर्थिक कार्यशाळेची सुरुवात केली आहे.हे शाळाबाह्य कौशल्य शिकविणा-या कार्यशाळेत पैशाचे मोल,बजेट,बँकेच्या मुलभूत प्रक्रिया,योग्य प्रकारे खर्च,बचतीची तंत्रे,आर्थिक तुलना कशी टाळावी,व पैशाविषयी चांगल्या सवयी यांचा समावेश आहे.किशोरांची आर्थिक समज वाढावी हे कंपनीचे ध्येय आहे.मुले मनीस्मार्टव्हावीत हा हेतू आहे.याचा प्रशिक्षण कालावधी दोन महिने आहे.आठवड्यातून दोनदा प्रत्येकी दोन तास.या योजनेचा सर्वप्रथम पुण्यात व त्यानंतर देशभर विस्तार करण्याचा निमकाचा मानस आहे.त्यासाठी सुशिक्षित व कार्यक्षम महिला निमकाची  फ्रान्चायझी घेवू शकतील.असे निमकाचे संस्थापक प्रिन्स पॉल यांनी नमूद केले.संपर्क www,nimka.in   ईमेल pp@nimka.in   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite