Peoples Media Pune header

Go Back

राजमाता जिजाऊ कॉलेजच्या ८८० विद्यार्थी विद्यार्थांनी घेतली अवयव दानाची शपथ

08 Aug 2018

भरतात रुग्णांना मोठ्या प्रमाणात अवयवदान हवे असते मात्र तुलनेने अत्यल्प प्रमाणात ते उपलब्ध होते.परिणामस्वरूप लाखो रुग्ण दगावतात.या पार्श्वभूमीवर रोटरीने अवयव दान मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे त्या अंतर्गत रोटरी क्लब पिंपरीच्या पुढाकाराने लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ आर्ट्स कॉमर्स व सायन्सच्या सुमारे ८८० विद्यार्थी विद्यार्थिनी व ३७ कर्मचारी यांनी अवयवदानाची शपथ घेतली.या कार्यक्रम प्रसंगी रोटरी पिंपरीचे अध्यक्ष नितीन ढमाले,रोटरी चिंचवडचे रो.मल्लीनाथ,प्राधिकरणचे रो वैजयंती,पिंपरीचे सेवा प्रकल्प डायरेक्टर मेहुल परमार,प्राचार्य गौतम भोंग,उपप्राचार्य दादासाहेब पवार.राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख दीपक पावडे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नितीन ढमाले यांनी देशातील बदल व आवश्यक सुधारणांचा मार्ग तरूण विद्यार्थ्यांतून जातो असे सांगितले.व विद्यार्थी जागृती झाल्यास अवयवदान चळवळीस गती येईल असे सांगितले.

छायाचित्र:अवयव दानाची शपथ घेताना विद्यार्थी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite