Peoples Media Pune header

Go Back

रोटरी फॉरच्यूनच्या वतीने श्री.परशुराम जगताप अनु.जाती केंद्रीय आश्रमशाळेतील मुलांची दंत तपासणी

08 Aug 2018

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने वळवा वस्ती,वडकी,हडपसर येथील श्री परशुराम जगताप केंद्रीय अनुसूचित जाती प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली.येथे १ ली ते १० वी चे १७५ निवासी विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत.या प्रसंगी रोटरी क्लब फॉरच्यूनचे अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोष्णीवाल.सेक्रेटरी भरत गुरव,मेडिकल डायरेक्टर रो.राजेंद्र सोनार,प्रकल्प प्रमुख रो.जयेश रोडे व रो सारिका रोडे,आश्रम संचालक रामराजे मोराळे.तपासणी करणारे डॉ.समीर डोलारे व डॉ.संजय वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे मुलांचे दातांचे आरोग्य शहरी तुलनेत उत्तम आढळले फक्त ४ ते ५ विद्यार्थ्यात किरकोळ समस्या आढळल्या.या प्रसंगी बोलताना आश्रम प्रमुख रामराजे मोराळे यांनी हा आश्रम निवासी असून २००२ पासून सुरु आहे.कोणतेही अनुदान मिळत नाही.विविध देणगीदार संस्थांच्या उदार आश्रयाने ही शाळा सुरु असल्याचे सांगितले.रो.डॉ.तोष्णीवाल यांनी आगामी काळात अन्नधान्य व अन्य आवश्यक बाबी पुरविण्यात येतील असे सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite