Peoples Media Pune header

Go Back

७०० महिलांनी लुटला आखाड पार्टीचा आनंद-श्री.सदानंद व सौ.सुजाता शेट्टी यांनी केले आयोजन.

11 Aug 2018

अनेक सण असलेला श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी अनेक ठिकाणी आखाड पार्टीचे आयोजन करण्यात येते.यात सहसा पुरुषवर्ग मोठ्या प्रमाणात असतो.मात्र महिलांना याचा आनंद लुटता येत नाही.या अनुषंगाने माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी व नगरसेविका सुजाताताई शेट्टी यांनी महिलांसाठी आखाड पार्टीचे आयोजन केले.हॉटेल वसंत येथे झालेल्या या स्नेहभोजनाचा आनंद सुमारे ७०० महिलांनी घेतला.यात सर्व जातीधर्माच्या गृहिणी,विद्यार्थिनी,कष्टकरी,ज्येष्टनागरिक महिला.अशा सर्व वयोगटाच्या महिलांनी सहभाग घेतला.शाकाहारी व मांसाहारी जेवण तयार करण्यात आले होते.या प्रसंगी बोलताना सदानंद शेट्टी यांनी सर्व प्रकारच्या समस्यांना प्रथम महिलांना तोंड द्यावे लागते,मात्र आनंद प्रसंगी त्या सर्वात शेवटी असतात.या साठी महिलांना आखाड स्नेहभोजनाचा आनंद मिळावा,त्यांच्या विविध अडीअडचणी समजाव्यात यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.या प्रसंगी सदानंद शेट्टी,सुजाताई शेट्टी,उमाताई शेट्टी,देशकर ताई आदी मान्यवरांच्या बरोबर कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite