Peoples Media Pune header

Go Back

जामा मस्जिद येवलेवाडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा

16 Aug 2018

जामा मस्जिद येवलेवाडी येथे मकतब-मदरसाच्या वतीने ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात ५ वर्ष ते १२ वर्षाचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.त्यांनी राष्ट्रगीत,विविध देशभक्तीपर गीते गायिली तसेच तिलावत(कुराण पठण)ही करण्यात आले.सर्व उपस्थित मुलामुलीना तिरंगा झेंडा व खाऊ वाटप करण्यात आले.या प्रसंगी आयाज उर्फ राजू पठाण,सिकंदर पानसरे(ट्रस्टी),राजू पानसरे(ट्रस्टी),नगरसेविका संगीताताई ठोसर,स्वप्नील शेलार(ग्रामपंचायत सदस्य),अरुण कामठे(पतपेढी चेअरमन),मुफ्ती इमरान(इमाम मस्जिद),शकील पानसरे,दादा धांडेकर,दिलावर पानसरे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना आयाज पठाण यांनी देशाचे स्वातंत्र्य हे अनेक वर्षांचा लढा,व मोठी कुर्बानी देवून मिळविले आहे.ते प्राणपणाने जपले पाहिजे असे सांगितले

छायाचित्र:जमा मस्जिद येथे स्वातंत्र्यदिन साजरा करताना मदरशातील विद्यार्थी व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite