Peoples Media Pune header

Go Back

देवतरू टिफिन सर्व्हिस-ज्येष्ठ नागरिकांसाठी

17 Aug 2018

शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर पासून देवतरुच्या वतीने घरी एकटे असणारे वृद्ध-ज्येष्ठ नागरिकांसाठी ताजे,गरमागरम,सात्विक असे घरगुती पद्धतीचे जेवण घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे.यात मासिक पद्धतीने ही सुविधा दिली जाईल.पहिल्या टप्प्यात साधारण सात कि.मी.पर्यंत राहणा-यांसाठी सेवा दिली जाईल.एक डब्बा साधारणपणे दोन जणांना पुरेल असा किंवा एकाला दोन्ही वेळेस पुरेल असा असेल.जेवण ज्येष्ठ नागरिकांना समोर ठेवून तयार केलेले पदार्थ असतील.आठवड्यातून एकदा गोड व पंधरा दिवसातून एकदा काहीतरी खमंग खाऊ असेल.तसेच आपल्या सणांचे पारंपारिक जेवणही दिले जाईल.शिवाय देवतरुकडून डब्बा धारकांसाठी ज्येष्ठ नागरिक मदत केंद्राचे सभासदत्व मोफत दिले जाणार आहे आणि इतरांसाठी त्याचे नाममात्र शुल्क आकारण्यात येईल.नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी मृदुला लेले 9359974785/चंदोडकर ९३५९९७५६९४

    कोलंबस हेल्थ केअर संचालित देवतरू फौंडेशनच्या माध्यमातून गेली चार वर्षापासून देवतरु  हे ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिचय उत्तम,सुसज्ज असे निवासस्थान चालविले जाते.देवतरू हे वृद्धाश्रम किंवा नर्सिंग होम न समजता इथे आजी आजोबा त्यांचे दुसरे घर समजून रहायला येतात.प्रत्येकाच्या तब्बेतीनुसार त्यांचा आहार,करमणुकीची साधने,वातानुकुलीत रूम्स,कार सर्व्हिस,सर्व वैद्यकीय सुविधा,नर्सेस,रूम सर्व्हिस सठी वेगळे कर्मचारी,छोटीशी लायब्ररी,फ़िजिओथेरपिस्ट,डॉक्टर राउंड अशा ब-याच सुविधा येथे मिळतात.देवतरु हे पर्वती पायथा व सारसबागेच्या मागे मध्यवर्ती ठिकाणी आहे.गेली चार पाच वर्ष बरेच आजी आजोबा व त्यांच्या मुला मुलींकडून अशीही मागणी व्हायची कि त्यांना त्यांच्या घरी राहायचे आहे.पण वरील सुविधा हव्या आहेत.यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आल्याचे.देवतरू फौंडेशनच्या संचालिका दीपिका खिंवसरा,मृदुला लेले,चांदोरकर काका व अजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite