Peoples Media Pune header

Go Back

बिबवेवाडी येथे श्री विश्वकर्मा सुथार समाज ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा

18 Aug 2018

बिबवेवाडी यथील विश्वकर्मा राजस्थानी सुथार ट्रस्टच्या वतीने ७२ व स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भेराराम सुथार होते.तर प्रमुख प्रमुख पाहुणेनिम्बाराम सुथार होते.कार्यक्रम प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष मोहनलालजी सुथर,अचलारामजी सुथार,चेनारामजी सुथार,सचिव अचलारामजी सुथार,खजिनदार प्रेमचंदजी सुथार,तसेच विशेष पाहुणे माजी अध्यक्ष राणारामजी सुथार,माजी शिक्षणतज्ञ समाजसेवक निम्बारामजी सुथार,आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट सुवर्णपदक विजेता मदन कुलरीया,भाजप मंडल अध्यक्ष शेरगढ हनुमानरामजी सुथार बाळासाहेब ओसवाल(नगरसेवक),आदी मान्यवरांच्या बरोबरच समाजबांधव,महिला,विध्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना निम्बाराम सुथार यांनी शिक्षण व संघटन यावर भर दिला तसेच समाजात मुलींचे शिक्षण वाढावे असे आवाहन केले.राणाराम सुथार यांनी समाजातील वाईट चालीरीती व व्यसने यावर अंकुश हवा असे सांगितले.हनुमानराम सुथार यांनी समाजाने राजकीय क्षेत्रावर प्रभुत्व मिळवावे असे सांगितले.मदन कुलरीया यांनी मुलीनी कराटे शिकावे असा सल्ला दिला.या प्रसंगी गुणी विद्यार्थी सत्कार करण्यात आला.तसेच त्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite