Peoples Media Pune header

Go Back

शरयूनगर प्रतिष्ठान व रोटरी पिंपरीच्यावतीने क्रांतिकारकांवर जिवंत देखावा सादर

17 Sep 2018

रोटरी क्लब पिंपरी,रोटरॅक्ट क्लब पिंपरी व शरयूनगर प्रतिष्ठान व यांच्या संयुक्त विद्यमाने सेक्टर २७,प्राधिकरण येथे गणेशोत्सवात क्रांतीकारकांवरील जिवंत देखावा जिवंत देखावा सादर करण्यात आला आहे.यात चाफेकर बंधूनी केलेला रँड वध,काकोरी कट,व क्रांतिकारी वासुदेव बलवंत फडके यांच्या जीवनातील प्रसंगांचा समवेश आहे.यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.या उपक्रमात रोटरी क्लब पिंपरीचे अध्यक्ष नितीन ढमाले,शरयू प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित भालेकर,रोटरॅक्ट अध्यक्ष निनाद जेठवा, रोटरॅक्ट ऐश्वर्या, रोटरॅक्ट धानुर, रोटरॅक्ट गौरव, रोटरॅक्ट रोहित यांनी सक्रीय सहभाग घेतला.या उपक्रमात १८ शाळांनी सहभाग घेतला आहे.या ठिकाणी रोज दोन चार शाळांमधील विद्यार्थी येतात.त्यांना ८ वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील १२ वा क्रांतीकारकांवरील धडा तज्ञ शिक्षकांकडून शिकविण्यात येतो.

छायाचित्र : क्रांतीकारकांवरील जिवंत देखाव्यातील एक दृश्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite