Peoples Media Pune header

Go Back

पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशन व आ.डॉ.नीलमताई गो.हे यांनी महिला सुरक्षा विषयावर चर्चा

17 Sep 2018

पुण्याचे पोलीस आयुक्त के.व्यंकटेशन यांनी शिवसेना प्रवक्ता आ.डॉ.नीलमताई गो-हे यांची त्यांच्या सिल्व्हर रॉक या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी महिला सुरक्षा,पुण्यातील प्रश्न याविषयी चर्चा केली.पोलीस स्टेशन मधील दक्षता समिती,नागरिक पोलीस संवाद,वाहतूक प्रश्न इत्यादींचा त्यात समावेश होता.डॉ.नीलमताई गो-हे यांनी पोलीस अधिकारी यांनी नागरिक अनेकदा काही सूचना करतात त्याकडे लक्ष द्यावे,अनेकदा या सूचना महत्वाच्या असतात असे सांगितले.डॉ.के.व्यंकटेशन यांनी सूचनांचा योग्य तो विचार करण्याचे आश्वासन दिले.तसेच पुणे पोलीस दलात १२०० पेक्षा ज्यास्त महिला विविध पदांवर कार्य करीत आहे,घरची व कामाची जबाबदारी उत्तमरित्या पार काढत आहेत याचा अभिमान असल्याचे नमूद केले.या प्रसंगी लतिकाताई गो-हे,झेलम जोशी,गीता वर्मा,अनिता परदेशी.व अन्य मान्यवर उपस्थित होते.डॉ.गो-हे यांनी आयुक्तांना आपले विधानसभा कामगिरी वरील पुस्तक भेट दिले.

छायाचित्र:पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेश यांचा पुस्तक देवून सत्कार करताना डॉ.गो-हे व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite