Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब युवाच्यावतीने निर्माल्य खतनिर्मिती प्रकल्पाचे आ.मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन

18 Sep 2018

पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे.या काळात गणेश पूजनासाठी मोठ्या प्रमाणावर फुले,फळे,नारळ यांचा वापर होतो व याचे निर्माल्य होते.हे लक्षात घेवून रोटरी क्लब युवा,ओपेल पोस्क्रो,व वेस्ट वुड इस्टेटयांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्प-श्रेडिंगमशीनचे उद्घाटन आ.मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.पटवर्धनबाग येथील टँकर पॉईन्ट येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी प्रांतपाल अभय गाडगीळ,रोटरी युवाचे अध्यक्ष श्रीकांत जोशी,माजी अध्यक्ष अजय कुलकर्णी,सचिव गोपाळ निर्मल,नगरसेवक जयंत भावे,नगरसेवक माधुरीताई सहस्रबुद्धे,संतोष लांजेकर(सेक्शन इंजिनियर),राजू पालमाठे,आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना मेघाताई कुलकर्णी यांनी हा उपयुक्त उपक्रम असून फक्त गणेशउत्सवच नाही तर वर्षभर राबवावा असे सांगितले.श्रीकांत जोशी  यांनी बोलताना रोटरी युवा गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबवीत असून तासाला दोन टन अशी याची क्षमता आहे.यातून निर्माण झालेले खत व्यवस्थित पॅकींग करून नागरिकांना मोफत वाटण्यात येईल असे सांगितले.

छायाचित्र :निर्माल्यखत प्रकल्पाचे उद्घाटन करताना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite