Peoples Media Pune header

Go Back

महात्मा गांधी जयंती निमित्त रोटरी लोकमान्य नगरची विद्यार्थ्यांसाठी सामाजिक सलोखा सहल.

02 Oct 2018

महात्मा गांधीजी हे अहिंसा व सामाजिक एकतेचे कट्टर पुरस्कर्ते होते.या मुळे महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ लोकमान्य नगरच्या वतीने आज स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय शाळेतील ३५  विद्यार्थ्यांची सामाजिक सलोखा सहल आयोजित करण्यात आली.या उपक्रमात विविध धर्माच्या प्रार्थनास्थळांना ,मंदिर,चर्च,विहार,मशीद,आणि गुरुद्वारा,अशा ठिकाणी विद्यार्थ्यांची भेट आयोजित करून त्या त्या ठिकाणी त्या त्या धर्माच्या मान्यवरांच्यावतीने धर्माची अधिक माहिती व चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सर्व धर्मांची माहिती होणे,सर्वधर्मे समभाव हे मूल्य समजून घेणे आणि सर्व धर्माविषयी मुलांच्या मनात आदर निर्माण व्हावा,या उद्देशाने क्लबने या उपक्रमाचे आयोजन केले.या उपक्रम प्रसंगी रोटरी क्लब लोकमान्यनगरच्या अध्यक्ष वासवी मुळे,उपक्रम प्रमुख रो.मयुरा डोळस,रो.मंदार कुलकर्णी,रो.विलास रवांदे,रो.रमेश कुंडले,तसेच स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मानकर सर,व इतर शिक्षिका आणि या उपक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिध्द लेखक प्रदीप आवटे व सौ माधुरी आवटे रो.महेश घोरपडे, उपस्थित होते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रथमच आगळ्या वेगळ्या पद्धतीने सामाजिक सलोख्याचा अनुभव घेत गांधी जयंती साजरी करण्याची संधी मिळाली.असे क्लबचे प्रसिद्धी प्रमुख रो महेश घोरपडे यांनी नमूद केले   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite