Peoples Media Pune header

Go Back

श्री महालक्ष्मी मूर्तीस रौप्य कमल आसन अर्पण

03 Oct 2018

श्रीमाली ब्राह्मण समाज पुणे यांच्या मंगळवार पेठ येथील महालक्ष्मी मूर्तीस रौप्य कमल(चांदीचे कमल रुपी बैठक)अर्पण करण्यात आली.मदन जैन यांनी कमल अर्पण केले,व माधव गणपुले यांनी देवीस शृंगार अर्पण केला भाविकांनी कमळाचे शास्रोक्त पूजन केले.या प्रसंगी डॉ.गुरुदत्त दवे(अध्यक्ष),डॉ.शरद नरतेकर,डॉ.अरुण जोशी.आदी मान्यवरांच्या बरोबरच भाविक नागरिक,महिलावर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.महाप्रसाद भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

छायाचित्र :महालक्ष्मीची सुंदर मूर्ती चांदीच्या कमलासनासह

 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite